माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

    बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूनानक जयंती दिवशी एकत्र येत स्नेहमेळावा संपन्न केला. यावर्षीचे त्यांचे सलग ७वे वर्ष होते. प्रारंभी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक विजयसिह मोंडकर यांनी आपण सर्व माजी विद्यार्थी हे ज्येष्ठ नागरिक असूनही महाविद्यालयामध्ये व गुरूनानक जयंतीलाच हा कार्यक्रम का करतो याबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे ईर्शाद शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य एम.बी.चौगले, माजी प्राचार्य आनंद बांदेकर, प्रा.देविदास आरोलकर, कैवल्य पवार, मेळाव्याचे अध्यक्ष श्रीनिवास नाईक, संयोजक विजयसिह मोंडकर, सुनिल सौदागर, गोवा येथील महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्य विद्या प्रभूदेसाई यांच्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर व सिधुदुर्ग येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते. पुढच्यावर्षीही याच दिवशी स्नेहमेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu