वेंगुर्ला न.प. आणि बॅ.खर्डेकर महाविद्यालय तसेच राऊंड ग्लास सस्टेन व सॅकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्विफ्टलेटच्या मार्गदर्शन शिबिराला वेंगुर्लावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्रीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील पश्चिम घाट, पश्चिम किनारा आणि समुद्रकिनारी असलेल्या बेटांवर भारतीय स्विफ्टलेटचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. वेंगुर्ला खडकातील इंडियन स्विफ्टलेटवरील त्यांचे संशोधन विशेष आणि प्रशंसनीय आहे. सलीम अली पक्षीशास्त्र आणि नैसर्गिक इतिहास केंद्र, तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेसह बॅ. खर्डेकर महाविद्यालय यांनी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. डॉ. शिरीष मांची आणि धनुषा कावलकर यांनी सर्वांना भारतीय स्विफ्टलेट आणि अधिवास ओळख करून दिली. एकत्रित प्रयत्नांमुळे प्रजातींचे संवर्धन आणि अधिवास यात कशी मदत होऊ शकते याबद्दल संबोधित केले. लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना संवर्धन प्रक्रियेत थेट मदत करू शकणाया वन्यजीवांबद्दल त्यांना संवेदनशील करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांनी डॉ.शिरीष मांची आणि धनुषा कावलकर यांनी स्विफ्टलेटविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच भारतीय स्विफ्टलेटवर राऊंड ग्लास सस्टेनने सुंदर माहितीपट बनवल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, कोकण इको टुरिझम क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनस्पतिशात्र विभागप्रमुख डॉ.डी.एस.पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन हिदी विभाग प्रमुख प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी केले तर आभार गणेश राऊळ यांनी मानले.