जनसुनावणीत ग्रामस्थांच्या विविध मागण्या

फोमेंतो कंपनीने मायनिगबरोबरच खनिज उद्योगावर आधारित स्टील प्रकल्प उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या तिलारी प्रकल्पातून रेडी गावासाठी मोफत पाणी पुरवून त्याचे बील फमेंतो कंपनीने भरावे. तसेच खाणीतील शेती बागायतीसाठी पुरवठा करून ती जमिन ओलिताखाली आणावी. गावच्या विकासासाठी शासनाकडून खनिज विकास निधी मिळावा. कंपनीने गावात २४ तास आरोग्य सेवा पुरवावी व सेवानिवृत्त झालेल्या व अन्य कारणास्तव कमी झालेल्या कामगारांच्या जागी दुस­­या कामगारांची भरती करावी अशा मागण्या रेडी सरपंच रामसिग राणे यांनी केल्या.

     मे.सोशियेदाद दी फोमेंतो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लि.गोवा यांच्या प्रस्तावित माऊली लोहखनिज ब्लॉक गाव रेडी (कनयाळ) येथील लोहखनिज उत्खननाबाबतच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक सुनावणी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकाटे यांच्या अध्यक्षतेखाली व सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रिजनल ऑफिसर जगन्नाथ साळुंके, उपप्रादेशिक अधिकारी राहूल मोटे, तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणार आहे. वातावरण सकारात्मक होऊन यामुळे भौगोलिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडून या भागाच्या विकासात मदत होऊन तसेच लोहखनिजाचे उत्पादन देशाला खनिज उत्पादनावरील कर आणि राज्याच्या तिजोरीत महसूल भर पडेल असे फोमेंतो कंपनीकडून सांगण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, उपसरपंच नमिता नागोळकर, चित्रा कनयाळकर, गोपाळ राऊळ, सायली पोखरणकर, दयानंद कृष्णाजी, पराग शिरोडकर यांच्या अन्य ग्रामस्थांनी जनसुनावणीत बरेच मुद्दे उपस्थित केले.

Leave a Reply

Close Menu