जि.प.अहमदनगर समितीची परूळे ग्रा.पं.ला भेट

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हापरिषद अहमदनगरच्या समितीने परूळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी केली.    यावेळी समितीने काथ्याप्रकल्पसांडपाणी प्रक्रिया युनिटप्लॅस्टिक कचरा संकलन युनिटप्रक्रिया संकलन युनिटअंगणवाडीशाळा, व्यायामशाळा यांजबरोबर इतर उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. पंचायत समिती नेवासाचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटेकरतालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटयेकोपरगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेखनगरचे विस्तार अधिकारी सानपुनेश्री.डोकेश्री.पाखरजिल्हा व्यवस्थापक आर.जी.एफ.ए.विजय गायकवाड यांसह सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक उपस्थित होते. सर्वांचे स्वागत परूळे उपसरपंच संजय दूधवडकर यांनी तर ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Close Menu