निवृत्त शिक्षकांनी संघटनेस बळ द्या! – सावळाराम अणावकर

संघर्ष करण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनेस बळ द्या. मग सर्व प्रलंबित प्रश्न आाम्ही निश्चित सोडवू. प्राथमिक शिक्षकांचे रजा काळातील रजा रोखीकरण होणारच असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी उपस्थितांना दिला.

      वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकशिक्षिकाकेंद्रप्रमुखविस्तार अधिकारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचा आनंद मेळावा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कार्यकारिणी पदाधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत साई मंगल कार्यालय येथे १७ जानेवारी रोजी संपन्न झाला.

      या मेळाव्यात यावर्षी सेवानिवृत्त झालेले निळकंठ धर्णेगोपीनाथ दाभोलकरश्री.कांडरकरसौ.कांडरकरकोमल पाटीलदिपाली वेंगुर्लेकर यांचे संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले. तर ७५ वर्षे पूर्ण झालेले सभासद श्रीमती तोटकेकरकमल मडकईकर यांना शालश्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकरउपाध्यक्ष प्रकाश दळवीउपाध्यक्ष ना.य.सावंतउपाध्यक्ष भरत आवळेकोषाध्यक्ष प्रताप बागवेजिल्हा सचिव सुंदर पारकर यांनी मार्गदर्शन करून संघटनेने केलेल्या कामाचा आढावा दिला. तसेच घनःश्याम वालावलकरफटनाईकभालेकरमनोहर सरमळकरके.टी.चव्हाणमाजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकरमहिला सदस्य कुसगांवकर आदींनी शुभेच्छा दिल्या. विद्याधर कडुलकर यांनी शिक्षकांच्या समस्या मांडल्या. त्यांचे जिल्हाध्यक्ष अणावकरउपाध्यक्ष प्रकाश दळवी व भरत आवळे यांनी निरसन केले. यावर्षी वेंगुर्ला तालुक्याची सहल मालवण येथे आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

      प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर यांनीसूत्रसंचालन कैवल्य पवार यांनी तर आभार सत्यवान पेडणेकर यांनी मानले. आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Close Menu