वेंगुर्ला न.प.तर्फे शून्य कचरा-हळदी कुंकू

वेंगुर्ला न.प.तर्फे ८ फेब्रुवारी रोजी कॅम्प-घोडेबांव गार्डन येथे घेण्यात आलेल्या शून्य कचरा-हळदी कुंकूसमारंभात ५०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी वाण म्हणून झाडाचे रोपटे देण्यात आले. तर हळदीकुंकू, फुले, तिळगुळ, लाडू आदी साहित्य ठेवण्यासाठी मातीची भांडी वापरण्यात आली होती. नैसर्गिक रंग व विड्याचे पाने वापरून रांगोळी काढण्यात आली. तर कार्यक्रमासाठी कापडी बॅनर वापरण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu