खेळ मनोरंजन नसून करिअर घडविण्याचे माध्यम – विशाल परब

खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तर ते एक करिअर घडविण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. खेळामुळे संघकार्यसमन्वयआत्मविश्वासनियोजन हे गुण आत्मसात होतात. जिल्ह्यातील खेळाडूंनी देशभरात नावलौकीक करावा. यासाठी पुढील काळात अशा स्पर्धांसाठी मी आग्रही असेल असे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शिरोडा येथे सांगितले.

      शिरोडा-केरवाडा सिहगर्जना क्रिकेट संघ व केरवाडी ग्रामस्थांतर्फे आयोजित केलेल्या चौगुलेश्वर चॅम्पियन ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेला युवानेते विशाल परब यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. आयोजकांतर्फे विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.चे माजी सदस्य प्रितेश राऊळभाजपाचे मनोज उगवेकरलक्ष्मीकांत कर्पे यांच्यासह सिहगर्जना क्रिकेट संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu