वेंगुर्ला येथील समर कॅम्पचा समारोप

वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

      व्ही.जी.फिटनेसतर्फे कॅम्प मैदानावर १३ ते १९ मे या कालावधीत सकाळी ८ ते ९ या वेळेत मोफत समर कॅम्प आयोजित केले होते. याचे उद्घाटन शंकर मांजरेकर यांच्या हस्ते झाले. या शिबिरात व्यायाम व खेळाबरोबरच विविध उपक्रमही घेण्यात आले. मुलांसोबत पालकांनीही स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यांनाही मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. समारोपप्रसंगी अॅड. मनिष सातार्डेकर यांनी फिटनेस महत्त्व सांगून व्हि.जी.फिटनेसचे अध्यक्ष वासुदेव गावडे यांचे कौतुक केले.

      हे समर कॅम्प यशस्वी होण्यासाठी बॉथम ऑल्मेडामृणाल परबसमिर प्रभूखानोलकरशामल मांजरेकरकविता चौधरी यांच्यासह व्हि.जी.फिटनेसचे सदस्य विकास सावळसिताराम कावळेप्रतिराज कुडपकरदिनेश कुडपकरस्वाती गावडे तसेच सहभागी सर्व मुलांच्या पालकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Close Menu