वेंगुर्ला बंदरवर टॉयलेटची सोय नसल्याने इथे येणा-यांमधून नाराजीचे सूर उमटत होते. याठिकाणची जागा ही मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने येथे कायमस्वरुपी टॉयलेट उभारणे नगरपरिषदेला शक्य नव्हते. दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषदेने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन स्त्रीया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी कंटेनर टॉयलेटची व्यवस्था केली आहे. याचे उद्घाटन नविन वर्षात १ जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, प्रशासकीय कर्मचारी शैलेश सातार्डेकर, सागर चौधरी आदी उपस्थित होते. या टॉयलेटमध्ये शौचालय, वॉशरुम आणि चेंजिग रुमची व्यवस्था उपलब्ध आहे. नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या या सोयीबद्दल पर्यटक, मच्छिमार, मच्छिविक्रेते व नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.