व्यापारी मेळाव्याला वेंगुर्ल्यात संथ प्रतिसाद

जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी एकता मेळाव्याला वेंगुर्ला तालुक्यात संथ प्रतिसाद मिळाला. येथील सुमारे ८० टक्के व्यापा-यांनी आपली दुकाने आज सुरु ठेवली होती.

      वेंगुर्ला शहरातील आठवडा बाजार हा रविवारी असल्यामुळे व याच दिवशी जिल्हा व्यापारी महासंघांने व्यापारी एकता मेळावा आयोजित केल्याने वेंगुर्ला तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. दरम्यान शहरातील काही किरकोळ हॉटेल व्यावसायिक व काही व्यापारी वगळता शहरासहीत तालुक्यातील सुमारे ८० टक्के व्यापा-यांनी आज आपली दुकाने उघडी ठेवली होती. तसेच सकाळपासून शहरात नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळाली. कोरोनासारख्या भयावह संकटातून व्यापारी सावरलेला नसतानाही ऐन आठवडा बाजाराच्या दिवशी हा मेळावा आयोजित केल्याने व्यापा-यांमध्ये तीव्र नाराजी स्पष्ट दिसून येत होती.

Leave a Reply

Close Menu