आरवली वैद्यकीय केंद्रात कोव्हीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय

शिरोड्यासह रेडी, आरवली, सागरतीर्थ याठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर शिरोडा पंचक्रोशीतील काही जागरुक लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरीक यांची तातडीची बैठक शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिरोडा ग्रामपंचायत सभागृहात सोशल डिस्टंनचे पालन करुन घेण्यात आली. यावेळी शिरोडा ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, राहूल गावडे, मयुरेश शिरोडकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच रिमा मेस्त्री, माजी उपसरपंच मयुर आरोलकर, आरवली पोलिस पाटील मधुसूदन मेस्त्री, शिरोडा पोलिस पाटील लक्ष्मण तांडेल, शिरोडा व्यापारी संघाचे सचिव व श्रीदेव वेतोबा देवस्थान आरवलीचे जयवंत राय, सागरतीर्थ उपसरपंच सुषमा गोडकर, रविद्र पराडकर आदी उपस्थित होते.

      आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे मध्यवर्ती ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्रात कोव्हीड सेंटर सुरु करुन ते शासनमान्य कोव्हीड सेंटर म्हणून मान्यता मिळण्यासाठी पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, तहसिलदार, आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. आरवली सरपंच तातोबा कुडव, सागरतीर्थ उपसरपंच सुषमा गोडकर यांनी याबाबतचे निवेदन संबंधितांना देऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Close Menu