►मोबाईल चार्जिगसाठी शहराकडे धाव

तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली असून अजूनही ग्रामीण भागात खंडित झालेला विजपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांचे मोबाईल बंदावस्थेत आहेत. दरम्यानवेंगुर्ला शहरातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी शहराकडे धाव घेत आपले मित्रपरिवारपाहुणे तसेच स्नेही यांच्याकडे मोबाईलपावर बँक तसेच लॅपटॉप आदी चार्जिगसाठी आणले आहेत.

Leave a Reply

Close Menu