हलाल लोगोच्या वस्तू घेणे बंद करा-मनोज खाडये

हलाल अर्थव्यवस्थेचासगळा पैसा हा केवळ दहशतवादाला पोसण्यासाठी जात आहे. मग सेक्युलर भारतात समांतर ही हलाल अर्थव्यवस्थाकशाला? त्यामुळे हिंदु बांधवांनो हलाल लोगो असलेली वस्तू घेण बंद करा. जेव्हा प्रत्येक घराघरातून हिंदू जागा होईल तेव्हाच या अशा कंपन्या हलाल सर्टिफिकेट रद्द करतील असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे गुजरात व गोवा राज्य पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांनी केले. यावेळी उपस्थित व्यापारी, उद्योजक व लोकप्रतिनिधींनीही याला सनदशीर मार्गाने विरोध करण्याचा निर्णय घेतला.

      वेंगुर्ला साई दरबार हॉलमध्ये उद्योजक कुणाल वरसकर यांनी विविध संघटना व्यापा-यांची ही एकत्र बैठक आयोजित केली होती. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे गिरीष पाठक, आशिष पाडगांवकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर, भाजपाचे शरदजी चव्हाण, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, व्यापारी बाळा शिरसाट, भय्या शिरसाट, मिलिंद शिवलकर तसेच उद्योजक बिपिन वरसकर, शिवदत्त सावंत, कुणाल वरस्कर, आपा धोंड, देवेंद्र प्रजापती, विकी आजगावकर, सनातनचे प्रवीण कांदळकर, महेश जुवलेकर, हिंदू जनजागृती समितीचे संदेश गावडे, गोपाळ जुवलेकर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू बांधव यावेळी उपस्थित होते.

      या हलाल प्रमाणपत्रासाठी ५० सहस्त्र रुपये आणि प्रतीवर्षी नूतनीकरणासाठी आणखीन वेगळे पैसे घेतले जातात. यातून निर्माण होत असलेली समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे. कारण या वस्तू आपल्याला हलाल खाऊ घालत आहेत. त्यामुळे आज गरज आहे ती, कुठलीही वस्तू खरेदी करताना ग्राहकाचा हक्क वापरून हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालणे, अशा लहान लहान गोष्टीतूनच मोठी जनजागृती होऊन हलाल अर्थव्यवस्था आपण रोखू शकतो असे श्री.खाडये यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu