सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिधुदुर्ग या संस्थेची वेंगुर्ला शाखा पाटील चेंबर्स, दाभोली नाका-वेंगुर्ला येथील आपल्या स्व-मालकीच्या जागेत स्थलांतरित झाली आहे. या स्थलांतरण सोहळ्याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्था चेअरमन शिवराम जोशी, व्हा.चेअरमन हिदवाळ केळुसकर, संचालक पिटर डॉन्टस, चंद्रकांत शिरसाट, दीनानाथ सावंत, बाबुराव कविटकर, सुभाष सावंत, मंगेश गांवकर, भिवा गावडे, नामदेव चव्हाण, स्वाती राणे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ, शाखा समिती सदस्य कॅ.प्रताप राणे, देवेंद्र गावडे, सरोज परब, शुभांगी गावडे, रामकृष्ण मुणगेकर, चंद्रशेखर जोशी, माजी नगरसेवक श्रेया मयेकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे सैनिक नागरी पतसंस्था ही ग्राहकाभिमुख सेवा देत असल्यामुळे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन जोशी यांनी केले.