ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढीत समजूतदारपणा महत्त्वाचा

वेंगुर्ला ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा १३ फेब्रुवारी रोजी अध्यक्ष आर.पी.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साई मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, माजी शिक्षणाधिकारी एम.पी.मेस्त्री, उपाध्यक्ष एस.एस.काळे, का.हू.शेख, करंगुटकर, बांदवलकर, येरागी, दाभोलकर, जगदिश तिरपुडे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

      कौटुंबिक वादातून समन्वय साधण्यासाठी जे अनुभव आले त्याची उदाहरणे घेऊन तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक म्हणून आपापसात समजूतदारपणा घेऊन समस्या जाणून घेतल्यास समाजामध्ये आनंदी, सुखी जीवन जगण्यास मदत होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समजूतदारपणा आणि तरुण पिढीची मदत यांचा मेळ घातल्यास परिवार सुखी समृद्ध राहू शकतो, असे मत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेले अॅड.शशांक मराठे यांनी व्यक्त केले.

      या मेळाव्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तर आर.पी.जोशी यांचा ९१वा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने साजरा करताना त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक आर.पी.जोशी यांनी तसेच विद्याधर कडुलकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Leave a Reply

Close Menu