बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ल, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग व नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात ५० महिलांची तपासणी करण्यात आली. बॅ.नाथ पै यांचे शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं.१ मध्ये स्मारक होण्यासाठी १ कोटी ७० लाख मंजूर झाले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर-सामंत, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.माने, डॉ.नामदेव मोरे, डॉ.शेटकर, डॉ.आदेश पालयेकर, आर्किटेक्ट अमित कामत यांच्यासह दिलीप गिरप, प्रकाश गडेकर, इर्शाद शेख, उमेश गाळवणकर, सुनिल डुबळे, सचिन वालावलकर उपस्थित होते.
पै यांचे निधन होवून ५१ वर्षे झाली तरीही अजूनही येथील लोक त्यांचे ऋण व्यक्त करतात. नाथ पै यांचे वेंगुर्ला हे जन्म गाव असल्याने फाऊंडेशनतर्फे येथे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अदिती पै यांनी दिली.