खुली निबंध स्पर्धा- मतदार म्हणून लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा

स्वातंत्र्यानंतर आपल्याला लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार मिळाला. याद्वारे लोकसभा, विधानसभा, स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूकांमधून आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. जे आपल्या भागातील आपल्या समस्या, अडचणी जाणून असतात. जनतेचे सेवक म्हणून आपण उमेदवाराला निवडून दिल्यावर पदभार स्वीकारल्यानंतर नेमके काय बदल घडतात. सत्ता आल्यावर हम करे सो कायदा, किंवा केवळ अमाप पैसे मिळविण्याचे ठिकाण असे समज समाजात दृढ होताना आजकाल दिसत आहेत. अशावेळी जी काही हाताच्या बोटावर मोजण्याजोगी थोडी मंडळी प्रामाणिकपणे काम करू पाहतात त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते.  झपाट्याने बदललेल्या पक्षीय राजकारणात लोकप्रतिनिधींना आपल्या भूमिकेला न्याय देता येतोय का? असे बरेच प्रश्‍न उपस्थित होतात. दरम्यान युती, महाविकास आघाडी अशा सत्तेच्या खेळामुळे अगदी गावपातळीवरचे राजकारणही ढवळून निघाल्याचे आपण पहात आहोत. यासाठी ‘मतदार म्हणून  लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा’  या विषयावर किरात ट्रस्ट तर्फे खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

     या निबंध स्पर्धेसाठी सुमारे 700 ते 1000 शब्द मर्यादा असून या मर्यादेतच निबंध् असावा. तसेच कोणत्याही स्वरुपाचे लेखन साहित्य पुन्हा पाठविले जाणार नाही. कृपया कोणी तशी मागणी करु नये. स्पर्धकांनी आपले निबंध दि. 25 मार्च 2022 पर्र्यंत kirattrust@gmail.com या मेलवर किंवा फूलस्केपवर सर्व बाजूंनी पुरेसा समास सोडून एका बाजूने लिहून तो द्वारा- संपादक, साप्ताहिक किरात, 92/2, खर्डेकर रोड वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग-416516 या पत्त्यावर पाठवावा. पारितोषिक विजेते तीन निबंध शताब्दी निमित्त करण्यात येणाऱ्या स्मरणिकेमध्ये प्रसिद्ध केले जातील. हस्तलिखिताची झेरॉक्स स्विकारली जाणार नाही. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 2000, 1500, 1000 तर उत्तेजनार्थ 500 रु. अशी रोख बक्षिसे दिली जातील. अधिक माहितीसाठी संपर्क- सीमा मराठे- 9689902367

Leave a Reply

Close Menu