बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ला पत्रकार संघ अजिंक्य

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित “इडमिशन” पुरस्कृत बाळशास्त्री जांभेकर चषक’ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ विजेता, तर मुख्यालय पत्रकार संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला. तब्बल 8 पत्रकार संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. 5 षटकांचे हे सामने झाले.

      माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत 11 फेब्रुवारीला आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीपळ वाढवित सामन्यांना सुरूवात करण्यात आली.

      यावेळी झालेल्या स्पर्धेत वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात तब्बल 67 धावांचे आव्हान मुख्यालय पत्रकार संघासमोर त्यांनी उभे केले. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी सर्वाधिक 4 सामने ते खेळले.  शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी वेंगुर्ला संघाने मालवण पत्रकार संघाचा तर जिल्हा मुख्यालय, ओरोस संघाने सावंतवाडी संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. वेंगुर्ले संघाच्या विनायक वारंग, प्रविण परब व अवधुत पोईपकर यांनी अर्धा संघ गारद केला. आशिष गांवकर, विशाल पोपकर क्वार्टर फायनलचे सामनावीर ठरले. सेमी फायनल सामनावीर म्हणून प्रवीण परब, गिरीष परब यांना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अवधूत पोईपकर, उत्कृष्ट फलंदाज प्रवीण परब, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बुधाजी हरमलकर यांना गौरविण्यात आले. तर अंतिम सामना सामनावीर चषक हर्षल परब, सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक गिरीष परब यांनी प्राप्त केला. तर उपविजेता पदाच्या चषकावर मुख्यालय पत्रकार संघ, विजेता पदाच्या चषकावर वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाने आपले नाव कोरले.

      या सामन्याचे गुणलेखन सुयोग जाधव, साईश नाईक, पंच म्हणून रघुनंदन गावकर, यशवंत मांजरेकर, अमर गावकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन राजा सामंत, बादल चौधरी यांनी केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले.

      यावेळी उपस्थित जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी तालुका पत्रकार संघाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भविष्यात जिल्हा पत्रकार संघाच सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. तर ईडमीशचे श्री. नाटलेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, बांदा पोलिस निरीक्षकांसह प्रतिष्ठीत नागरिकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu