ब्लॉग व सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिका! – ऋषी देसाई

आपल्या हातात सोशल मिडियाचे मोठे व्यासपीठ आहे त्याचा वापर आपण कसा आणि का केला पाहिजे, ब्लॉग का लिहायचा, त्याचे विविध उद्देशांवर आधारित दहा प्रकार, ब्लॉगिंग चा इतिहास, इत्यादी विषयी अनेक उदाहरणे देत लोकशाही टिव्ही चॅनलचे स्टार न्यूज अँकर ऋषी देसाई यांनी कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाच्या स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील ब्लॉग लेखन आणि मीया विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तृतीय वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात ब्लॉग लेखन या विषयाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना ब्लॉग लेखन म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी करावी, त्याची उपयुक्तता काय इत्यादी गोष्टी प्रत्यक्षात समजाव्यात या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून, महाविद्यालयाच्या मराठी विभागाने या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

     मराठी विभाग प्रमुख प्रा.कैलास राबते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्य डॉ. रामचंद्र काटकर यांनी मा. ऋषी देसाई यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  तर प्रा.एच.एम.चौगले यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu