स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सव

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा, शाखा वेंगुर्ला या संस्थेची वेंगुर्ल्यातील 27 वर्ष तर मूळ स्थापनेची 50 वर्ष ही निष्कलंक वाटचाल आहे. आजच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार यांच्यामध्ये असलेला विश्‍वास पतसंस्थेची विश्‍वासपात्र, पारदर्शी कारभार म्हणून नावारुपाला आलेली ही परंपरा अखंडीत राहो अशा भावना ॲड. सुर्यकांत प्रभू खानोलकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितली. 2 मार्च 1973 मध्ये आजरा येथे स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद नागरी सह. पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या शाखा वेंगुर्ला येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शाखा चेअरमन किर्तीमंगल भगत उपस्थित होते. शाखाधिकारी अशोक मिटके यांनी संस्थेची 31 जानेवारी 2022 अखेर एकूण ठेवी 5 कोटी, कर्जवाटप- 4 कोटी तर एकूण व्यवसाय 10 कोटी असल्याचे सांगत ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्‍वासार्हतेवरच हे कामकाज सुरु असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण ठेव योजना आणि रिकरींग सुवर्ण ठेव योजनेविषयी माहिती दिली. किर्तीमंगल भगत यांनी आत्तापर्यंत पतसंस्थेला मिळालेल्या पुरस्काराची नोंद घेत अत्यल्प भांडवलावर सुरु झालेली आणि बऱ्याच अडचणींचा सामना करुन संस्थेतील कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता, संचालकांवरील समाजाचा असणारा विश्‍वास या गोष्टींवरच संस्थेची प्रगती आजपर्यंत झाली आहे.  नॅशनल बँक आणि पतसंस्था यांच्यामध्ये मुलभूत फरक असतो. मोठे उद्योजक पतसंस्थेशी जोडले जाताना समाजाचा शेवटचा घटकही पतसंस्थेचा ग्राहक आहे. येथेच पतसंस्थेचे सहकारामध्ये वेगळे स्थान अधोरेखित होते आहे असे दिलीप गिरप यांनी मनोगत मांडले. या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त भरत सातोसकर, आपा परब, के.जी. गावडे, मॅक्सी कार्डोज, सीमा मराठे, विनायक वारंग, प्रदीप सावंत, प्रथमेश गुरव या पत्रकारांचा, अनिल सौदागर, शिल्पा बोवलेकर, किरण तोरसकर, साईप्रसाद नाईक, बाबु राऊत या शाखा सल्लागारांचा तर अरविंद गोरे, सिद्घेश्‍वर प्रभू खानोलकर, देविदास वालावलकर, रमाकांत दाभोलकर, महादेव मोटे, शामसुंदर मुणनकर, बुधाजी येरम, चंद्रकांत भैरट, पांडुरंग मिसाळ, दिगंबर भगत, वासुदेव जोशी, अब्दुल रेहमान शेख, प्रतिभा बोवलेकर, आनंद रेडकर, पांडुरंग जामदार, सुनिल मठकर, उमेश मठकर आदिंचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन दीपक भगत यांनी केले.

Leave a Reply

Close Menu