ब्राह्मण जातीबद्दल केलेल्या निदनीय वक्तव्याबाबत अमोल मिटकरी यांनी त्वरित प्रसार माध्यमातून माफी मागावी. अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल अशाप्रकारचे निवेदन महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिधुदुर्ग, वेंगुर्ला शाखेच्यावतीने येथील तहसिलदार यांना देण्यात आले.
इस्मालपूर येथे १९ एप्रिल रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिर सभेत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी बोलताना ब्राह्मण समाज आणि पौरोहित्य याविषयी अपशब्द वापरले. तसेच हिदू वैदिक पद्धतीने केल्या जाणा-या विवाह संस्काराची खिल्ली उडवताना कन्यादान या विधीवरच प्रश्नचिन्ह उभे केले असून त्यामुळे समाजात गैरसमज पसरुन धार्मिक तेड निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमातून त्वरित माफी मागावी आणि वाद मिटवावा. अन्यथा सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल असे निवेदनात नमूद केले आहे.
नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी जगदीश गोडबोल, राघवेंद्र जोशी, केशव जोशी, नारायण बापट, प्रतिक्षा जोशी, मानसी जोशी, सुमन रानडे, श्रीकृष्ण ओगले, अरुण गोगटे, प्रशांत आपटे, भूषण जोशी, गुरुनाथ जोशी, महादेव गोखले, पांडुरंग साधले, गजानन गोखले, विश्वनाथ चिपळूणकर, संगीता चिपळूणकर, श्रीधर गोरे, मधुरा आठलेकर, सुरेश जोशी, प्रदिप जोशी, मयुरेश जोशी, दिलीप जोशी, चंद्रकांत फाटक, विवेक गोगटे, प्रभाकर जोशी, राजू पेठे, श्रीकांत रानडे, सुधीर मराठे यांच्यासह अन्य ब्राह्मण उपस्थित होते.