मोफत योग प्रशिक्षणाला प्रारंभ

वेंगुर्ला न.प.आणि डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने न.प.प्रशासकीय इमारती नजिक, स्वामी विवेकानंद हॉल येथे २४ एप्रिलपासून सकाळी ६ ते ७.३० या वेळेत मोफत योग प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी  संगिता कुबल यांच्या हस्ते झाले.

      यावेळी डॉ.वसुधा मोरे, अंबरीश मांजरेकर, अक्षदा मांजरेकर, मीरा सावंत, उर्वी गावडे, वृंदा मोर्डेकर, विजय सावंत, सौ. भानूशाली आदी उपस्थित होते. हे योग प्रशिक्षण २१ जूनपर्यंत चालणार असून यात शास्त्रोक्त, ग्रंथोक्त, प्राचिन पारंपरीक योगशास्त्र शिकविले जाणार आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयविकार, पाठदुखी, मानदुखी, निद्रानाश, चिता, काळजी, डिप्रेशन अशा विकारांवरील योगोपचाराचे मार्गदर्शन केले जाणार आहे. १० ते ७० वर्षापर्यंतच्या स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हा वर्ग असून येताना पाण्याची बाटली, सतरंजी, नॅपकीन आणि मधुमेह असणा-यांनी थोडीशी साखर सोबत ठेवावी. तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Close Menu