विकासकामांसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची २३ एप्रिल रोजी त्यांच्या मंत्रालयातील दालनांत  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांनी सिंधदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ला प्रभारी तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर, तालुका महिला अध्यक्ष दिपिका राणे या शिष्टमंडळासमवेत भेट घेतली. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांबाबत चर्चा करण्यांत आली. तसेच सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यांत आलेल्या उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांची व स्टॉफची कमतरता असल्याने रूग्णांना सेवा मिळण्यास अडचण होते. त्यामुळे रूग्णालयास अत्यावश्यक ते डॉक्टर व स्टॉफ द्यावा. तसेच अवेळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू उत्पादक बागायतदारांचे नुकसान झालेले त्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत द्यावी, अशी मागणी करत विविध विकास कामांचे निवेदन त्यांना सादर केले. या शिष्टमंडळास विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याची माहिती नितीन कुबल यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu