वेंगुर्ल्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घाला

सिधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात अंमली पदार्थांची राजरोजसपणे होणारी तस्करीलागवडसेवन व वाहतुकीस तातडीने आळा घालावाअशी मागणी वेंगुर्ल्यातील सर्व राजकिय पक्षसामाजिकस्वयंसेवी संस्थासामाजिक कार्यकर्ते व पालक यांनी एकत्रितपणे लेखी निवेदनाद्वार वेंगुर्ला निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे केली आहे.

      पर्यटनदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकास होताना परराज्यातून होणारी चोरटी दारु वाहतुकअंमली पदार्थांची राजरोसपणे होणारी तस्करीडोंगरी माथ्याशी तसेच अतिशय दुर्गम भागात होणारी लागवडशहर तसेच नाक्यानाक्यावर काहीवेळा होणारी खुलेआमचोरीछुपे खरेदी-विक्रीअल्पवयीन मुलामुलांना लागलेला मादक द्रव्याच्या अतिसेवनाचा नादरात्रीच्यावेळी होणारी अंमली पदार्थांची वाहतुक यासारखे अनेक प्रश्न आम्हा पालक व नागरीकांसमोर उभे राहिले आहेत.

      गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या सीमेवरुन चोरटी वहातुक होत असताना पोलिस यंत्रणा गप्प कशी राहू शकते. हा सर्वसामान्य जनतेला सतत भेडसावत आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारीही पोलिस प्रशासनाची असताना युवा पिढीसाठी बरबाद होणारी वाईट कृत्ये थांबविण्याची नैतिक जबाबदारी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीसिधुदुर्गची आहे. पण आहे की नाही याच उत्तर संबंधित यंत्रणेला लवकरच जाहीररित्या द्यावे लागेल.

      फक्त वेंगुर्ला शहर व तालुक्याचा विचार करता सध्याची तरुण पिढी आई-वडिलांचे संस्कार पायदळी तुडवून अंमली पदार्थांच्या अतिसेवनाकडे वळलेली असून या वाममार्गामुळे त्यांचे भविष्य अंधःकारमय दिशेने जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यापुढे असे अनैतिक प्रकार आमच्या तालुक्यात होऊ नयेत यासाठी नागरीक व शासकीय यंत्रणा याची एकत्रित दक्षता समिती स्थापन करुन अंमली पदार्थ्यांच्या या गुन्हेगारी क्षेत्राला आळा घालण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करुन सामुहिकरित्या त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहेअसे आम्हाला वाटते. तसेच तालुकास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची तात्काळ स्थापना करुन दर १५ दिवसांनी आढावा व दिशा ठरविण्याची सभा घेण्यात याव्यात. या सभेला सर्व सामाजिक संघटनाशासकीय पक्षाचे अधिकारीहॉटेल-बार संघटनारिक्षा संघटनाव्यापारी संघटनासर्व शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते याची तातडीची सभा पुढील ८ दिवसांत तहसिलदार कार्यालयात घेण्यात यावीअशीही सूचना निवेदनात करण्यात आली आहे. यावर योग्य ती कार्यवाही त्वरित व्हावी अन्यथा पोलिस महासंचालकजिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे दाद मागावी लागेलअसे नमुद करण्यात आले आहे. हे निवेदन आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर व काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ईर्षाद शेख यांनी पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांना सादर केले. या निवेदनावर विविध स्तरातील २६ जणांच्या सह्या आहेत.

      वेंगुर्ला शहरात अंमली पदार्थासाठी वापरण्यात येणार ठिकाणे निमुसगा ते लाईट हाऊसपर्यंतकन्याशाळा आवारबीएसएनएल ऑफिसच्या मागेकॅम्प स्टेडियमतहसिलदार आजूबाजूचा परिसरधावडेश्वर स्मशानभूमीचा परिसरडच वखारपोलिस लाईनमधील खोल्यानगरपरिषद कचरा डेपो ते दाजी परब यांच्या बागेकडील रस्ताहोळकर मंदिरकडे जाणारा रस्तापावरहाऊस वीजमंडळ कर्मचा-यांच्या वसाहतीजवळवेंगुर्ला बंदररहाटाची विहिर ते तांबळेश्वर स्मशानभूमीकुंभवडे परिसरपाटकर हायस्कूल परिसर या भागात अंमली पदार्थांचा व्यवहार चालतो अशी माहिती यावेळी पोलिस निरीक्षकांना देण्यात आली आहे.

      निवेदन सादरकरतेवेळी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंतभंडारी पतसंस्थेचे माजी चेअरमन जयराम वायंगणकरनिवृत्त गटविकास अधिकारी बाबली वायंगणकरराष्ट्रवादीचे शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अॅन्थोनी डिसोजाराष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजिव लिगवतशहर अध्यक्ष सत्यवान साटेलकरअॅड.मनिष सातार्डेकरफुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकरमाजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकरवामन कांबळेमाजी जि.प.सदस्य मकरंद परबमहिला काथ्याच्या संचालिका प्रज्ञा परबमाजी पं.स.सदस्य चित्रा कनयाळकरमाजी पंचायत समिती सभापती चित्रा कनयाळकरसुचिता वजराटकरभाजपाच्या वृंदा मोर्डेकरवाय.जी.कदमपी.के.कुबलशिवराम आरोलकर यांसह निवेदनावर सह्या केलेल्या व्यक्ती उपस्थित होते.  

Leave a Reply

Close Menu