सिंधुदुर्गातील कलाकारांचे दिल्ली येथे चित्रप्रदर्शन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्ली येथे 12 ते 24 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते 7 या वेळेत ‘भारताचे भाग्यविधाता’ हे प्रदर्शन होणार आहे. भारताचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना भारत स्वतंत्र्य होण्यापूर्वीचा इतिहास ज्या वीर क्रांतीकारकांच्या योगदानामुळे संपन्न झाला. त्या व्यक्तींचे कार्य चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शनाच्यानिमित्ताने उपलब्ध करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पुढाकारान होणाऱ्या या चित्र प्रदर्शनात वेंगुर्ला-आसोली येथील एस.बी.पोलाजी यांनी आपल्या भागातील विद्यार्थ्यांनाही यामध्ये संधी दिली आहे. त्यामध्ये सतिश नाईक (भेडशी), संयुक्ता कुडतरकर (सावंतवाडी), यश चोडणकर (कुडाळ), दत्तराज नाईक (गोवा) यांचा समावेश आहे. या आधी न्यूयॉर्कमध्ये 1997 मध्ये 50व्या स्वतंत्र दिवसानिमित्ताने एस.बी.पोलाजी यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी त्यांचा सन्मान केला होता. आत्तापर्यंत अमेरिकेत 17 ठिकाणी चित्रांचे प्रदर्शन तर कोकण विभागातही अनेक ठिकाणी एस.बी.पोलाजी यांनी आपण काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन तसेच रांगोळी प्रदर्शन मांडले आहे. यासाठी बांदा-वाफोली येथे ते विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणही घेतात. या विद्यार्थ्यांना अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच व्यासपिठ मिळवून देत प्रोत्साहन दिले आहे. यावेळीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात येणाऱ्या या चित्रमय प्रदर्शनात एस.बी.पोलाजी यांच्या मदतीने त्यांचे विद्यार्थी दिल्ली येथे स्वातंत्र्यपूर्व 150 वर्षांचा इतिहास मांडणार आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी असणारा पोलाजी सरांचा उत्साह आणि सर्वसमावेशक विचार सर्र्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Close Menu