शैक्षणिक वर्ष 2021 ते 2022 च्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या योगशिक्षक या महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदविका परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वेंगुर्ला येथील डॉ.वसुधाज योगा फिटनेस ॲकॅडमीचा निकाल 100 टक्के लागला.
यामध्ये प्रथम- प्राजक्ता प्रशांत आपटे (वेंगुर्ला) 75.67%, द्वितीय- दिपाली सूर्यकांत पालयेकर (वेंगुर्ला) 75 %, तृतीय-रामा वासुदेव पोळजी (वेंगुर्ला) 71.67%, चतुर्थ-शितल गोविंद गवस (बांदा) 70.67 %, पाचवा- अंकिता आतिश जाधव (कल्याण) 70.50%, सहावा-रिद्धी राकेश नेवरेकर (रत्नागिरी) 69.83%, सातवा- सुजाता राकेश दळवी (दोडामार्ग) 68.83%, आठवा- माया राजेंद्र फलारी (मडगांव) 63.17%, नववा- मारीया आशिष आल्मेडा (वेंगुर्ला) 60% यांनी क्रमांक पटकाविले. यातील प्राजक्ता आपटे आणि डॉ.दिपाली पालयेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या कोल्हापूर केंद्रात विशेष योग्यता श्रेणीत स्थान मिळविले आहे. या सर्वांना डॉ.वसुधा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी साधकांचे संचालिका डॉ.वसुधा मोरे, डॉ.नामदेव मोरे, सिंधुदुर्ग प्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश नवांगुळ, कोल्हापूर योग विद्याधामचे रमेश धाक्रस, रोहीत गवळी, प्रकाश पाटील, समिक्षा वालावलकर, अक्षता मांजरेकर, अंबरीश मांजरेकर यांनी अभिनंदन केले. वेंगुर्ला येथील डॉ.वसुधाज योगा ॲण्ड फिटनेस ॲकॅडमी संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र, गोवा, संपूर्ण भारत आणि युरोप, अमेरिकेसह अनेक देशातील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वाय.सी.बी.लेवल 1 ते 7 या अभ्यासक्रमाचेही अभ्यास केंद्र व परिक्षा केंद्र असल्याची माहिती डॉ.वसुधा मोरे यांनी दिली.