बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ल्याचे मुख्य लिपिक संजय पाटील यांना मुंबई विद्यापीठाचा गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी हा पुरस्कार प्राप्त झाला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये ५००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुंबई-सांताक्रुझ विद्यानगरी येथील फिरोजशहा ऑडिटोरियममध्ये शिक्षक दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या सोहळ्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, प्रभारी कुलगुरू डॉ. रविद्र कुलकर्णी व प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळणकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले. दैनंदिन महाविद्यालयाच्या कामासोबत शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील महाविद्यालयातील ३५० पेक्षा अधिक प्रस्तावांमधून संजय पाटील यांची निवड केली हे विशेष.
या पुरस्काराबाबत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.