मानसी फाटक

          सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजची माजी विद्यार्थीनी मानसी गजानन फाटक (रा.वेंगुर्ला) पुणे येथील पॉवर प्लेसमेंट कन्सल्टन्सी या मोठ्या कंपनीची टीम लिडर (एचआर) बनली आहे. गवाणकर कॉलेजमधून बीएमएस पदवी प्राप्त केल्यानंतर ती पुणे येथे गेली व तात्काळ तिची कंपनीत मोठ्या पदावर नियुक्ती झाली.

      गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वीच मानसीची टीम लिडर (एचआर) म्हणून निवड झाल्यानंतर अलिकडेच गावी आल्यावर तिने ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले व एवढ्या मोठ्या हुद्यापर्यंत आपली निवड झाली त्या कॉलेजच्या ऋणातून कसे उतराई व्हायचे या उद्देशाने गवाणकर कॉलेजला भेट दिली.

      मी जे काही करिअर करत आहे ते गवाणकर कॉलेजमुळे. या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सावंतवाडीत बीएमएस पदवी सुविधा उपलब्ध करुन दिली, त्यामुळेच मी शिकू शकले. येत्या काही महिन्यात गवाणकर कॉलेजमध्ये प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तरुण-तरुणींना बिझनेस प्रोसेस आऊट सोर्सिंग बीपीओ विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करणार आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जवळपास 500 हून अधिक तरुण-तरुणींना निश्‍चितपणे नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे मानसी फाटक हिने सांंगितले.

      मानसी फाटक हिची झेप निश्‍चितच कौतुकास्पद आहे. कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करुन कॉलेजचे ऋण फेडण्याचा तिचा प्रयत्न आहे. तिच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे प्राचार्य यशोधन गवस म्हणाले.

Leave a Reply

Close Menu