अथर्व मुळेची एमएससाठी निवड

          वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी कै.डॉ.अतुल मुळे यांचा सुपुत्र अथर्व मुळे याची अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठात एम.एस. शिक्षणाकरिता निवड झाली आहे. केमिकल इंजिनिअरींगमध्ये तो एम.एस.करणार आहे.

     वेंगुर्ला येथील मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी असलेला अर्थव याचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण राजस्थान-कोटा येथे झाले. नंतर त्याची आयआयटीसाठी निवड झाली. रुकडी (उत्तराखंड) आय.आय.टी.मधून त्याने केमिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक ही पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर एम.एस.करीता त्याची टेक्सास विद्यापिठात निवड झाली. अथर्वला पुढे जाऊन सिलिकॉन चिप्स् इंजिनिअरींगमध्ये स्पेशालायझेशन करायचे आहे. अथर्व हा डॉ.संगीता मुळे यांचा सुपुत्र होय.

    

 

Leave a Reply

Close Menu