वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश स्कूलचा ११वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कै.देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान मुंबईचे सल्लागार प्रफुल्लचंद्र परब, कलावलयचे संजय पुनाळेकर, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच लकी ड्राॅ सोडतमधील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी विविध कलागुण सादर केले. प्रास्ताविक कु. पल्लवी भोगटे, सूत्रसंचालन श्रीया धुरी तर आभार कु. निकिता गावडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.