राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष जागरूकता दाखवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण येण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार हेच मार्ग काढू शकतात. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबुत करा, असे प्रतिपादन कोकण विभागीय महिला अध्यक्षा तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी वेंगुर्ला येथील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित कार्यक्रमांत केले.
वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित केलेला कष्टकरी महिला व पुरुष यांना त्यांच्या दररोज मालविक्रीच्या व्यवसायांत कडक उन्हात तसेच पावसांत आपला व्यवसाय करीत असताना होणारा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या छत्र्या वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, जिल्हा डॉक्टरसेलचे अध्यक्ष डॉ. संजिव लिंगवत, महिला तालुकाध्यक्षा दिपिका राणे, शहर महिला अध्यक्ष अपूर्वा परब, माजी तालुकाध्यक्ष बावतीस डिसोजा, शहर सचिव स्वप्निल रावळ आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा महिला संघटकपदी डॉ. सई लिंगवत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी फैजान शेख, आडेली विभागीय अध्यक्षपदी वैभव वाडकर, कामळेवीर बुथप्रमुख उमेश आळवे, वजराठ बुथप्रमुख सचिन सावंत, अनिकेत वेंगुर्लेकर, विशाल परब, दाभोलीचे बुथ अध्यक्ष लाडोबा सारंग यांना पक्षाची नियुक्ती पत्रे देण्यात आली तसेच डॉ.सई लिंगवत यांचा सर्वसामान्य जनतेशी व महिलांशी असलेला संफ व त्यांचे वैद्यकीय सहकार्याचे काम उत्कृष्ठ असल्याबद्दल अर्चना घारे-परब यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवून तर जेष्ठ सदस्य बबन पडवळ यांचा सत्कार करण्यांत आला.