हातभार ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोबाईल द्यावा लागला. परिणामीमुलांच्या डोळ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. हीच बाब लक्षात घेऊन हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करताना  २१ जून रोजी पाटकर हायस्कूलमधील विद्यार्थीशिक्षक व पालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. उद्घाटन पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते झाले.

      मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करून संस्थेला नगरपरिषदेच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक आत्माराम सोकटेहातभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकरवासुदेव गावडेएकनाथ चव्हाणजिल्हाध्यक्ष संजय पिळणकरजिल्हा सचिव यश माधवशुभांगी ऑप्टिक्सचे निलेश हरमलकर व समीर हरमलकरहातभार संस्थेचे वेंगुर्ला संफ प्रमुख प्रतिक खानोलकरमहिला संघटक अस्मिता भराडीनिखिल भराडी आदी उपस्थित होते.

      यापुढेही हातभार हा ट्रस्ट सावंतवाडीदोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर व संस्थापक अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी सांगितले. तर हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर यांचे ‘‘मिशन २०००‘‘ ला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन शुभांगी ऑप्टिक्सच्यावतीने सचिन हरमलकर यांनी दिले. सूत्रसंचालन व आभार शिक्षक महेश बोवलेकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu