दाभोसवाडा येथे अवतरले प्रतिपंढरपूर

वेंगुर्ला-दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईच्या सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या दिड्यांनी परिसर भक्तिमय बनला. टाळ-मृदंगांच्या गजराबरोबरच पौराणिक कथांवर आधारीत केलेल्या विविध वेशभूषा आकर्षण ठरल्या.

      दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात गेले सात दिवस अखंड विणा सप्ताह सुरु होता. या सात दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध मंडळांची संगीत व वारकरी भजनेही पार पडलीसप्ताहाच्या सातव्या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे दाभोसवाडा व विठ्ठलवाडी येथील भाविकांनी आपापल्या दिड्या ज्ञानोबा तुकारामाच्या‘ जयघोषात विठ्ठलरखुमाई मंदिरात आणल्या. दोन्ही दिड्यांमधील भजनाने परिसर भक्तिमय बनला होता. या दोन्ही दिड्यांमध्ये वारकरी वेशभूषा केलेले भजनी मंडळी आणि पौराणिक कथांवर आधारीत केलेले विविध वेशभूषा आदींचा समावेश होता. दिड्या मंदिरात येताच मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयजयकार करण्यात आला.

      या दिड्यांच्या स्वागतासाठी दाभोसवाडा ते विठ्ठल मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढून आणि पताका लावून परिसर सुशोभित करण्यात आला. दोन्ही दिड्यांमधील वारक-यांनी भजनाबरोबरच ज्ञानोबा तुकारामाच्या‘ जयघोषात विविध नृत्यप्रकार साजरे केले. दाभोसवाडा येथे अवतरलेले हे प्रतिपंढपूर याची डोळायाची देही‘ पहाण्यासाठी पंचक्रोशीतील  नागरिकांनी गर्दी केली.   

Leave a Reply

Close Menu