आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची थीम वसुधैव कुटुंबकमसाठी योग अशी आहे. या वर्षी 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत जलबांदेश्‍वर येथे निसर्गरम्य ठिकाणी समुद्राच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.  21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगा सरावाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि जगभरातील लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाचे महत्त्व आणि ते संतुलन साधण्यासाठी योगाची भूमिका अधोरेखित होते. वसुधैव कुटुंबकम या योग थीमला अनुसरुन निसर्गाच्या सान्निध्यात वेेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत योग दिन साजरा केला. डॉ.वसुधा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके केली गेली. या शिबिरात न.प अधिकारी, कर्मचाऱी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Leave a Reply

Close Menu