हुतात्मा स्मारकाला अभिवादन

वेंगुर्ला भाजपातर्फे शहरातील ग्रामीण रूग्णालयासमोरील हुतात्मा स्मारकाला माजी नगराध्यक्ष राजन गिरप व तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून पंचप्राण शपथ घेण्यात आली. सर्व पंचप्राणाच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले. यावेळी स्मिता दामले, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, बाळू प्रभू, जयंत मोंडकर, गिरगोल फर्नांडीस, भुषण आंगचेकर, भुषण सारंग, शेखर काणेकर, नितिश कुडतरकर, पुंडलिक हळदणकर, सुधीर पालयेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार, परिचारिका तांडेल, सुनील मठकर, रसिका मठकर, शरद मेस्त्री इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu