विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींत गुरफटू नये

भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील दहावी-बारावीतील ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा व शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मिळून २० मुख्याध्यापकांचा स्वामिनी मंडपम येथे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, भाजपाचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, राजन गिरप, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, पप्पू परब, ज्ञानेश्वर केळजी, सारिका काळसेकर, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, मनवेल फर्नांडीस, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, सत्यविजय गावडे, मनोज उगवेकर, नितीन चव्हाण, विजय रेडकर, बाळु प्रभू, समीर नाईक, हेमंत गावडे, सायमन आल्मेडा, सत्यवान परब, दिलीप परब, नंदा गावडे, संदिप देसाई, जेष्ठ नागरिक संघाचे शामराव काळे, मुख्याध्यापक संघाचे वामन तर्फे, गुरुदास कुसगावकर, प्रदीप शिंदे, एम.जी.मातोंडकर, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर यांनी केले.

         शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या. वाईट गोष्टींमध्ये न गुरफटता योग्य मार्ग निवडून आपल्या व देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu