काव्यवाचनाने उपस्थितांची मने केली चिब

क्रांतीदिनाचे औचित्य साधून मठ येथील डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमध्ये निसर्गकवी ना.धों.महानोर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या मन चिब पावसाळीया कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उपस्थितांना काव्यवाचनात चिब भिजून टाकले. प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम आणि मनोहर परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मठ केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव आव्हाड यांनी केले. मुख्याध्यापक एस.ए.जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. निसर्गकवी ना.धों.महानोर व शाळेचे माजी शिक्षक शंकर तेजम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सुरूवात मनोहर परब यांच्या काव्य सादरीकरणाने झाले. त्यानंतर त्यांनी मनोहर परब यांनी काव्यनिर्मितीचे विशेष, मुलांची रंजकता व मुलांची काव्यप्रेरणाविषयी मार्गदर्शन करून एका पेक्षा एक काव्य सादर केली. समिक्षा बोवलेकर हिने मन चिब पावसाळी‘, रश्मी भगत हिने स्वलिखित काव्य सादरीकरण तर श्रावणी धुरी, रेणुका बोवलेकर, समिक्षा मेस्त्री, भाविका आईर, प्राची दाभोलकर, अक्षदा गावडे, चिन्मय मठकर, सोहम गावडे, साईश गडेकर, विठ्ठल गावडे, प्रांजली सकपाळ, आर्यन पवार, प्रज्ज्वल धुरी, वसंत ठाकूर, कृष्णा गावडे, लवू ठाकूर, लक्ष्मण कोकरे, सिद्धी सावंत, सुषमा गावडे, कृतिका धुरी या विद्यार्थ्यांनी शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, ग.दी. माडगूळकर काव्यवाचन करीत कार्यक्रमाला रंगत आणली. विठ्ठल कदम यांनी मुलांचे कौतुक करीत काव्यातील बारकावे व गोडवे मुलांना सांगितले. प्रास्ताविक स्वप्नाली कांबळी यांनी, सूत्रसंचालन रश्मी भगत हिने तर आभार गणुराज गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र नाईक, दिगंबर मोबारकर, अनिकेत कांबळे यांसह सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Close Menu