तृणधान्य, कडधान्य व रानभाज्यांच प्रदर्शन

शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य, कडधान्य व रानभाज्यांची ओळख व्हावी व त्यांचे गुण समजावेत यासाठी उभादांडा नवाबाग शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. यात भारंगी, पेवा, टाकळा, रानउडीद, तेरं, घोटवेल, दिडा, लाजाळू, गुळवेल, फागलं, भूईआवळा, कुरडू, एकपान या रानभाज्या तर नाचणी, बाजरी, ज्वारी, वरी आदी तृणधान्यांसहीत काही मोड आलेली कडधान्ये मांडण्यात आली होती. प्रदर्शनाला शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, शा.व्यव.अध्यक्ष अनंत केळुसकर, उपाध्यक्ष दत्ताराम कोळंबकर, तन्वी रेडकर, पालक उत्तम आरावंदेकर, वसंत तांडेल, शिवानंद आरावंदेकर, नंदकिशोर मांजरेकर, बाबुराव रेडकर, वैष्णवी केळुसकर, अक्षरा गोकरणकर, लक्षिका केळुसकर, दिप्ती तांडेल, पंढरी मोर्जे, अर्चना गिरप, अश्विनी केळुसकर, श्रीमती मोर्जे, श्रीमती तारी आदींनी भेट देऊन कौतुक केले. मुख्याध्यापिका प्राजक्ता आपटे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर रामा पोळजी यांनी रानभाज्यांविषयी माहिती दिली. यावेळी मारूती गुडुळकर, सोनाली नागवेकर, स्नेहल आरावंदेकर, अश्विनी बागायकर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu