जालना येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात शासनाच्या निषेधार्थ वेंगुर्ला तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. जालना येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जबाबत संबंधित अधिकायांवर कारवाईचीही मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी मराठा समाज कमिटीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब, संजय गावडे, समन्वयक रविद्र परब, तुळशीदास ठाकूर, योगेश कुबल, महिला प्रमुख प्रज्ञा परब, यशवंत परब, अजित राऊळ, विधाता सावंत, पपू परब, कृतिका कुबल, अस्मिता राऊळ, रूपाली पाटील, कुमा ठाकूर, संदिप परब, अल्पसंख्यांक वेंगुर्ला तालुकाप्रमुख रफिक बेग, आकांक्षा परब, उत्कर्षा परब, दिगंबर परब, प्रभाकर सावंत, दत्तगुरू परब, अभिजित राणे, गौरव परब, विशाल गावडे, राजू शेटकर आदींसह अन्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर ती चुकीची आहे. भविष्यात न्याय हक्कांसाठी भांडत असताना न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल,असे सिद्धेश परब यांनी सांगितले.