निवृत्त शिक्षकांना सत्काररूपी केली ‘गुरूवंदना‘

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थीप्रिय शिक्षक व तत्त्वज्ञ होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून वेंगुर्ला हायस्कूल येथे भाजपाने गुरूवंदनाहा कार्यक्रम घेतला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार साहित्यिक शिक्षक अजित राऊळ व भाजपा प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यात रमण किनळेकर (आसोली हायस्कूल), एस.एस.काळे (वेंगुर्ला हायस्कूल), जागृती वायंगणकर (चमणकर हायस्कूल आडेली), एम.जी.मातोंडकर (अणसूर पाल हायस्कूल), प्रकाश शिरोडकर (अ.वि.बावडेकर शिरोडा), विशाखा वेंगुर्लेकर (आसोली हायस्कूल), स्वाती वालावलकर (सातेरी हायस्कूल वेतोरे), सावळाराम कांबळी (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), आनंद सावंत (अ.वि.बावडेकर शिरोडा), अवधूत एनजी (अ.वि.बावडेकर शिरोडा) यांचा समावेश होता. यावेळी वेंगुर्ला हायस्कूलचे १९६७चे माजी विद्यार्थी व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक प्रकाश नांदोस्कर हे माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, सरपंच संघटना अध्यक्ष पपू परब, दिलीप परब, वसंत तांडेल, दादा केळुसकर, भूषण सारंग यांनी परिश्रम घेतले. पांडुरंग सामंत यांनी कार्यक्रमाचे निवेदन तर मुख्याध्यापक पी.डी.कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu