लाभार्थ्यांना मोफत जयपूर फुट प्रदान

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, लोककल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या सौजन्याने रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे २ लाभार्थी राजन नायर व अनामिका शिरोडकर तसेच रोटरी क्लब कॅश्यू सिटी दोडामार्गचे २ लाभार्थी रविद्र कांबळे व सुशिला नांदवळकर यांना मोफत जयपूर फुट प्रदान करण्यात आले.

      कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्टगव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, व्यवस्थापक चव्हाण, कांबळे व अन्य उपस्थित होते. लाभार्थ्यांना जयपूर फुट मिळण्यासाठी रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पीएचएस राजेश घाटवळ, असिस्टंट गर्व्हनर संजय पुनाळेकर, सुनिल रेडकर, कॅश्यू सिटी दोडामार्गचे विशांत तळवडेकर, सचिन नाईक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu