सफाई कर्मचा­-यांना विमा पॉलीसी प्रदान

वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या कायम सफाई कर्मचा­­-यांकरिता समूह स्टार हेल्थ इन्शुरन्स काढून त्यांना विमा सुरक्षा कवच दिले आहे. सफाई कर्मचा­यांचा स्वनिधीतून समूह आरोग्य विमा काढणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही राज्यातील पहिली आणि एकमेव नगरपरिषद आहे. या विमा पॉलिसीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, पत्रकार के.जी.गावडे, दाजी नाईक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. विमा पॉलिसीसोबतच सफाईवेळी लागणारे बुट, हातमोजे, मास्क, गणवेश, ओळखपत्र आदींचेही वितरण करण्यात आले.

 

Leave a Reply

Close Menu