प्रसन्ना देसाई यांना नियुक्त पत्र प्रदान

पावशी येथे ७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत वेंगुर्ला येथील भाजपाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात अन्य नुतन जिल्हा पदाधिका­यांनाही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.  यावेळी पालकमंत्री रविद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कोकण विभाग संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांसह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu