सर्वांच्या सहकार्यामुळेच यशस्वी सेवा दिली-संजय पाटील

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक संजय पाटील हे आपल्या नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रा.वैभव खानोलकर, प्रा.डॉ.विलास देऊलकर, प्रा.एम.बी.चौगुले, बाबूराव खडपकर, प्रा.वामन गावडे, प्रा.चुकेवाड, प्रा.डी.बी.राणे, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, देशपांडे मॅडम, प्रा.शितोळे, गोखले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.ए.आर.पाटील, रामदास परब, महेश घाडी, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.डॉ.पी.आर.गावडे, प्रा.डॉ.पाटोळे, महेश राऊळ यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

      संजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रशासनामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांनी गौरवोद्गार काढून त्यांची निःस्वार्थी सेवा महाविद्यालयाच्या स्मरणात राहणार असल्याचे सांगितले. श्री. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन तर सौ.पाटील यांचा सौभाग्यलेणे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रा.संजय मेणसे, प्रा.ए.आर.पाटील, चितामणी सावंत, रामदास परब, महेश घाडी, दिलीप शारबिद्रे, धनाजीराव यादव, लता चौगुले, प्रसन्ना देसाई, सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळचे प्रतिनिधी श्री.राऊळ या सर्वांनी संजय पाटील यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.

      बॅ.खर्डेकर महाविद्यालयात तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक सेवा करीत असताना महाविद्यालयातील सर्वांचे सहकार्य मिळाल्याने आपण यशस्वी सेवा देऊ शकलो असे मत संजय पाटील यांनी व्यक्त करून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन मंजिरी देसाई-मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळेकर यांनी तर आभार प्रा.डॉ.बी.जी.गायकवाड यांनी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Close Menu