वेंगुर्ला शहरातील जय हनुमान मित्रमंडळातर्फे 11 नोव्हेंबर रोजी जुना स्टॅण्ड येथे खुली नरकासूर स्पर्धा घेण्यात आली. यात सातेरी मित्रमंडळ पाटीलवाडा यांनी प्रथम, खतरनाक मित्रमंडळ घाडीवाडा यांनी द्वितीय, आकर्षक मित्रमंडळ हॉस्पिटल नाका यांंनी तृतीय तर बागायत बॉईज बागायत वाडी व कुबलवाडा मित्रमंडळ कुबलवाडा यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 8 हजार, 6 हजार व 4 हजार तर उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी 4 हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले. जय हनुमान मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या उपस्थितीत विजेत्या मंडळांना गौरविण्यात आले.