वेंगुर्ला न.प.च्या तत्कालीन मुख्याधिकारी संजिवनी दळवी यांनी महाराष्ट्रात ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे बायोगॅस प्रकल्प बंद पडत असताना देखील वेंगुर्ला शहरात बायगॅस आणि कांडी कोळसा प्रकल्प मंजूर करून त्याचे काम सुरू केले. सन २०१५ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू झाले. या अभियानात तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यापारी, स्वयंसेवी संस्था, मंडळे, सफाई कामगार व प्रशासनाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छतेची रोवलेली मुहूर्तमेढ ‘झिरो वेस्ट‘ने यशस्वी ठरली. झिरो वेस्ट या स्वच्छ भारत पर्यटनस्थळाच्या ठिकाणी शहरातील निर्माण झालेल्या विविध प्रकारातील कचयाचे वर्गीकरण करून सर्व कचरा स्वच्छ भारत पर्यटन प्रकल्पस्थळी नेऊन त्यावर ‘झिरो वेस्ट‘ च्या माध्यमातून प्रक्रिया केली जाते.
स्वच्छ अभियानाच्या ३१ कोटी रूपयांच्या बक्षिसांबरोबरच कचयावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती व विक्री करून दरवर्षी सुमारे ५ लाख रूपयांचे उत्पन्न वेंगुर्ला नगरपरिषद घेत आहे.
