गोपाळ सेवा दाता प्रतिनिधींची आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जि.प.सिंधुदुर्ग, गोकुळ दुध संघ-कोल्हापूर व भगिरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची आढावा बैठक २७ डिसेंबर रोजी ओरोस येथे संपन्न झाली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकुर, डॉ. विद्यानंद देसाई, डॉ.तुषार वेंगुर्लेकर, डॉ.संतोष कुडतरकर, डॉ.गावकर, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद देवधर व गोपाळ सेवा दाता लाभार्थी उपस्थित होते. त्यानंतर ३६ दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीतील व प्रत्यक्ष काम करीत असतांना आलेले अनुभव गोपाळ सेवा दाता देवेंद्र पाताडे, शुभम कवठणकर, प्राची गुरव, अंकुश माजगांवकर, रामदास भोगले, रूपेश गावकर, प्रथमेश पाटील यांनी कथन केले. शेतक­याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपूरक व्यवसायासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu