जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ‘आयएसओ‘ मानांकन प्राप्त

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ‘ISO 27001 : 2013 चे मानांकन प्राप्त झाले असून बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. बँकेच्या संवेदनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहण्यासाठी ‘ISO 27001 : 2013 लागू करण्याचा निर्णय घेतला. कारण रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सायबर सेक्युरिटी फ्रेमवर्कनुसार ग्राहकांच्या माहितीची सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आले आहे. बँकेने १२/१२/२०१२ रोजी पहिले डाटा सेंटर उभारले. त्यानंतर बँकेने नवीन सुधारणा विचारात घेऊन नवीन अद्ययावत डाटा सेंटर १ जुलै २०२१ रोजी उभारले आहे. या डाटा सेंटरचे आयएसओ मानांकन करण्याचे बँकेच्या संचालक मंडळाने ठरवले व मार्च २०२३ मध्ये बँकेच्या ‘ISO 27001 : 2013साठी TUV India Pvt. Ltd. या ब्युरोची निवड केली. आर्थिक क्षेत्रात काम करणा­या संस्थेला मानांकन मिळणे ही फार मोठी कष्टप्रद गोष्ट आहे. परंतु बँकेने मापदंडासाठी आवश्यक त्या नियम व अटींची पूर्तता करुन दि. २५/१०/२०२५ अखेर पर्यंत मुदत असलेले आयएसओप्रमाणपत्र प्राप्त केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Close Menu