वेंगुर्ल्यात मंगल कलशाची भव्य शोभायात्रा संपन्न

वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा आज सोमवारी काढण्यात आली. या यात्रेत शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत रामनामाचा गजर करण्यात आला.

      शोभायात्रेच्या प्रारंभी  ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात देवस्थान मानक-यांच्या हस्ते मंगलकलशाची विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंगलकलश पालखीमध्ये ठेऊन मोटरसायकल रॅलीने यात्रेला प्रारंभ झाला. ही रॅली रामेश्वर मंदिरशिरोडा नाकाकलानगरमांडवीदाभोसवाडाजुना एस.टी.स्टॅण्डदाभोली नाकाबाजारपेठमारूती मंदिरहॉस्पिटल नाकाभटवाडी पेट्रोल पंपआडी स्टॉपवरसकर स्टॉपसंत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडीगणपती मंदिरडॉन्टस कॉलनीगवळीवाडापॉवर हाऊससातेरी मंदिरराऊळवाडा मार्गे राम मंदिर अशी काढण्यात आली. 

      शिरोडा नाकादाभोसवाडाजुना एसटी स्टॅण्डगिरपवाडादाभोली नाकाबाजारपेठमारूती स्टॉपहॉस्पिटल नाकावडाचे सांदेकरभटवाडीआनंदी अर्पितवरसकर स्टॉपसंत लालाजी मंदिरगणपती मंदिरडॉन्टस कॉलनीगवळीवाडाकॅम्प कॉर्नरसातेरी मंदिरराऊळवाडा व राम मंदिर येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu