रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत आयोजित सलग १० व्या वर्षी खुल्या चित्रकला स्पर्धेत रूजूल सातोसे, काशिनाथ तेंडोलकर, दिक्षा पालकर तर रंगभरण स्पर्धेमध्ये भार्गवी धुरी व भूमि परूळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धेत मिळून जिल्ह्यातील २८८ पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला. उद्घाटन तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रभानंद सावंत व सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते झाले.

      रंगभरण स्पर्धा-बालवाडी गट-प्रथम-भार्गवी धुरी (आसोली), द्वितीय-स्पृहा तेंडोलकर (सिधु.विद्यानिकेतन), तृतीय-शुभ्रा ठुंबरे (तुळस), उत्तेजनार्थ-गंश परब (तुळस) व श्रीराज कोंडुसकर (होडावडे), पहिली ते दुसरी गट – प्रथम-भूमि परूळकर (वेताळ विद्या.तुळस), द्वितीय-विरक्ती वरगांवकर (राऊत विद्या.रेडी), तृतीय-ज्ञानदेव राऊळ (वेताळ विद्या.तुळस), उत्तेजनार्थ-आराध्या राऊळ (वेंगुर्ला नं.४) व आराध्या म्हापणकर (पाट नं.१)

      चित्रकला स्पर्धा – तिसरी ते चौथी गट – प्रथम – रूजूल सातोसे (पडते शेठ शाळा, कुडाळ), द्वितीय-सिया गावडे (सिधु.विद्यानिकेतन), तृतीय-गार्गी भोगण (मिलाग्रीस स्कूल), उत्तेजनार्थ- पूर्णिमा पेडणेकर व रघुनाथ पिगुळकर (सिधु. विद्यानिकेतन), पाचवी ते सातवी गट – प्रथम – काशिनाथ तेंडोलकर (मठ नं.१), द्वितीय-राशी सातोसे (के.एम.एस.पी इं.स्कूल कुडाळ), तृतीय-तन्मय नेरूरकर (नेरूर नं.१), उत्तेजनार्थ – जय तांडेल (उभादांडा नं.१) व सर्वेश मेस्त्री (वेंगुर्ला नं.३), आठवी ते दहावी गट – प्रथम-दिक्षा पालकर (अणसूर पाल हाय.), द्वितीय-केतकी रेडकर (सिधु.विद्यानिकेतन), तृतीय-विष्णू आरोलकर (दाभोली हाय.), उत्तेजनार्थ-प्रिया देसाई (मिलाग्रीस हाय., सावंतवाडी) व साहिल सातार्डेकर (जनता विद्या.तळवडे).

      उद्घाटनप्रसंगी उपसरपंच सचिन नाईक, लोकमान्य को ऑपरेटिव्ह बँकचे पुंडलिक राऊळ, चक्रपाणी गवंडे, शितल नाईक, सगुण माळकर, सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर, संदीप तुळसकर, बबन घोडे-पाटील आदी उपस्थित होते.

      स्पर्धेचे परिक्षण पंकज घोगळे व आशिष कुंभार यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.सचिन परूळकर, महेश राऊळ, गुरूदास तिरोडकर, सागर सावंत, मिलन तिरोडकर, मंगेश सावंत, माधव तुळसकर, वैष्णवी परूळकर, सुधीर चुडजी, विधी नाईक, रोहित गडेकर, किरण राऊळ, हेमलता राऊळ, सानिया वराडकर, यशवंत राऊळ, सचिन गावडे, जान्हवी सावंत, प्रतिक परूळकर यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Close Menu